पुणे – राज्यातील महापालिका इ गव्हर्नन्स निर्देशांक जाहीर करण्यात आला त्यात पुणे महानगरपालिकेने अग्रस्थान प्राप्त केले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने द्वितीय तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तृतीय स्थान निवडले आहे. अंध किंवा दिसणारे व्यक्तींसाठी केवळ सात महानगरपालिकांनी स्क्रीन रीडर ची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे निर्देशकांतून समोर आले आहे. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन तर्फे हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. सेवा,पारदर्शकता,उपलब्ध आहे प्रमुख तीन निकष संकेतस्थळ,मोबाईल ॲप्लिकेशन, समाज माध्यम हे तीन माध्यम अशा एकूण अशा 101 निकषांवर महापालिकांचे मूल्यमापन करण्यात आले.
