दिनांक 29 1 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या दरम्यान भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत भिगवण पोलीस स्टेशन रोटरी क्लब महामार्ग सुरक्षा पथक डाळज नंबर 2, ग्रामपंचायत भिगवन व पोलीस स्टेशन हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक यांच्या संयुक्त विद्यमानाने भिगवन परिसरात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये भैरवनाथ विद्यालय भिगवण, अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल, या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन रॅली काढून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत प्रबोधन करण्यात आले. पतनाट्या साठी सहशिक्षक श्री संघपाल कांबळे, श्री रजनीकांत भोसले, रोटरी अध्यक्ष सौ अर्चना जानकर व सौ मोहिनी गावडे यांनी परिश्रम घेऊन मुलांना मार्गदर्शन करून पथनाट्यद्वारे वाहतूक नियमांचे कसे पालन करावे याचे सादरीकरण केले. राष्ट्रीय वाहतूक सप्ताहाद्वारे माननीय गणेश बिराजदार सो, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, माननीय डॉक्टर सुदर्शन जी राठोड उपविभागीय अधिकारी बारामती विभाग पुणे ग्रामीण यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय वाहतूक सप्ताहामध्ये माननीय गणेश बिराजदार अप्पर अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण, माननीय सुदर्शन राठोड उपविभागीय अधिकारी बारामती विभाग, विनोद महांगडे, सहाय्यक पोलीस- निरीक्षक भिगवन, प्रवीण जरदे पोलीस उप- निरीक्षक भिगवण, विजय खाडे पोलीस उपनिरीक्षक भिगवण स्टेशन मधील स्टाफ, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री संतोष सवाने, संस्थापक अध्यक्ष सचिन भोगावत, शिव फाउंडेशन चे अध्यक्ष संपत बंडगर, रो.सदस्य रंजीत भोंगळे, रियाज शेख, संजय चौधरी, कुलदीप ननवरे, संजय खाडे, किरण रायसोनी, संजय रायसोनी, जावेद शेख, तुषार क्षीरसागर , महामार्ग पोलीस पथक डाळज नंबर 2 प्रमुख श्री कुरेवाड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस स्टाफ, भिगवन ग्रामपंचायत सदस्य, भैरवनाथ विद्यालय भिगवन चे विद्यार्थी तसेच अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
