-पोंधवडी येथील ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात पार पडला.यंदाचा प्रजासत्ताक दिन सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या प्रभात फेरीने करण्यात आली. प्रभातफेरी नंतर शाळेतील ध्वजारोहण झाले. शाळेतील 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण पोंधवडीच्या सरपंच सारिका शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणानंतर मुलांची भाषणे झाली. या कार्यक्रमात आंतर शालेय स्पर्धेत यश मिळवलेल्या मुलांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.संस्थेचे अध्यक्ष अभिजित यमगर यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात गावचे विद्यमान उपसरपंच डॉक्टर खारतोडे,माजी उपसरपंच प्रदीप बंडगर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नारायण बंडगर, पोलीस- पाटील सोमनाथ सोनवणे,हनुमंत शिंदे सोसायटी चे संचालक दीपक मलगुंडे,विक्रम पानसरे,सामाजिक कार्यकर्ते रवी भोसलेअंकुश खारतोडे सर ,हनुमंत पवार,संजय लाहोर,गोरख आटोळे, एकाड बापू, बापूराव पवार, श्रीकांत काशीद, बजरंग शिंदे,वसंत वायाळ, दादा पवार कल्याण खारतोडे,रामभाऊ भोसले, संतोष पवार तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व पालक उपस्थित होते! कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा डोईफोडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्य बिचकुले मॅडम उप प्राचार्य गिरी मॅडम,पाटील मॅडम, मुंजेवार मॅडम, सिंग मॅडम, शेख मॅडम,बनकर मॅडम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले!
